---Advertisement---

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

By Abhijeet Bharade

Updated on:

ladakibahin-yojana
---Advertisement---

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

लाभधारक कोण आहेत ?

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (यापैकी कोणतेही एक)
    • १५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र
    • जन्म प्रमाणपत्र
    • शाळा सोडल्याचा दाखला
  3. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (यापैकी कोणतेही एक)
    • १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड
    • १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र
    • जन्म प्रमाणपत्र
    • शाळा सोडल्याचा दाखला
    • अधिवास प्रमाणपत्र
  4. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
    • पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
    • शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  5. नवविवाहितेच्या बाबतीत
    • रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
  6. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)
  7. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

अर्जाची प्रक्रिया

  1. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा
    • जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर “Register” किंवा “नवीन खाते तयार करा” वर क्लिक करा.
    • तुमचा मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आणि आधार कार्ड क्रमांक इत्यादी माहिती भरून खाते तयार करा.
    • जर आधीपासून खाते असेल तर “Login” किंवा “लॉगिन करा” वर क्लिक करा आणि तुमचा युजरनेम व पासवर्ड टाका.
  3. अर्जाचा फॉर्म निवडा
    • लॉगिन केल्यावर “अर्ज करा” किंवा “Apply Now” हा पर्याय निवडा.
    • “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” फॉर्म निवडा.
  4. व्यक्तिगत माहिती भरा
    • अर्जात तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरा. उदा. नाव, जन्मतारीख, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, इत्यादी.
    • माहिती योग्य व प्रमाणिक भरा.
  5. कागदपत्रे अपलोड करा
    • आवश्यक असलेली कागदपत्रे, जसे की आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक पासबुक, आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.
    • कागदपत्रे अपलोड करताना फाईलचा आकार आणि प्रकार तपासून बघा.
  6. बँक खाते तपशील भरा
    • तुमच्या बँक खात्याचे तपशील भरा. खात्याचे नाव, खात्याचा क्रमांक, IFSC कोड इत्यादी.
    • खात्याचे तपशील बरोबर भरा, कारण लाभाची रक्कम याच खात्यात जमा होणार आहे.
  7. फॉर्म सबमिट करा
    • सगळी माहिती आणि कागदपत्रे तपासून फॉर्म सबमिट करा
    • सबमिट केल्यावर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. तो सेव्ह करून ठेवा.
  8. प्रिंटआउट घ्या
    • अर्जाचा प्रिंटआउट घ्या किंवा PDF फाईल सेव्ह करा, भविष्यातील उपयोगासाठी
  9. अर्ज स्थिती तपासा
    • अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या अर्जाची स्थिती तपासा
    • योजनेच्या वेबसाइटवर “अर्जाची स्थिती” किंवा “Track Application” हा पर्याय वापरा

या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता.

Abhijeet Bharade

मी ऑनलाइन सेवांवरील मार्गदर्शन करणारे माहितीपूर्ण व्हिडिओ युट्यूबवर बनवतो. याशिवाय, मी स्वतः या विषयांवर सविस्तर लेख माझ्या वेबसाइटवर लिहितो, जेणेकरून लोकांना डिजिटल प्रक्रियांमध्ये आवश्यक असलेली माहिती आणि तंत्र समजावून घेता येईल. माझं मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांना त्यांच्या आर्थिक आणि ऑनलाइन कामांमध्ये अधिक पारंगत बनवणं, त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती सुलभतेने पुरवणं आहे

---Advertisement---

Related Post

Leave a Comment